नंदुरबारात मशिद परिचयाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:50 IST2021-02-08T12:50:12+5:302021-02-08T12:50:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मशिदीमध्ये नेमके काय असतं आणि तेथे नेमकं काय केल जातं आणि कुराणाचा अर्थ व ...

नंदुरबारात मशिद परिचयाचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मशिदीमध्ये नेमके काय असतं आणि तेथे नेमकं काय केल जातं आणि कुराणाचा अर्थ व उद्देश तरी काय याची माहिती सांगणारा अनोखा मस्जिद परिचय कार्यक्रम प्रथमच नंदुरबारात पार पडला. या कार्यक्रमास मुस्लिम आणि हिंदु बांधव उपस्थित होते.
शहरातील चिराग अली मोहल्लाह मस्जिद येथे हा आगळवेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अकोला येथील दाई इश्तीयाक अहमद, सय्यद अबुल आला, औरंगाबाद येथील डाॅ. वकार यांनी प्रबोधत्मक प्रवचन दिले. त्यांच्याकडून मस्जिदमध्ये नेमकं काय असतं, तिथं नेमकं काय केलं जातं, अजानचा अर्थ व उद्देश काय, नमाज पठाण कशी करतात. त्याचा अर्थ काय, इस्लाम धर्माची मूळ शिकवण काय आहे याची माहिती देण्यात आली. यावेळी सय्यद अबुल आला यांनी अल्लाह, ईश्वर व गाॅड हे एकाच परमेश्वराचे नाव असून संपूर्ण मानव जाती एक पुरूष एक स्त्री पासून निर्माण झाली असून त्या अनुषंगाने संपूर्ण मानव जाती आपसात रक्ताच्या नात्याने बंधु भगिनी असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विश्व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रविंद्रसिंग परदेशी, नगरसेवक माेहन माळी, आनंद माळी, राजू माळी, निलेश माळी, माणिक माळी, विजय माळी, दिनेश माळी, संभाजी माळी, संस्थांचालक संघटनेचे सचिव प्रा. एन.डी.नांद्रे, जामायितचे अध्यक्ष मौलाना जकारिया उपस्थिती लाभली. यशस्वीतेसाठी हाजी इरफन मेमन पठाण नासिर , आबिद मिस्त्री, आसिफ खान यांच्यासह परिसरातील मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाचे शहरातून उत्स्फूर्त स्वागत
दरम्यान या उपक्रमाचे शहरातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. सामाजिक सलोखा रुजवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना वाव देण्याची अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. मशिदीतील विविध बाबींची माहिती देण्यात आली.