शहाद्यात दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:12 IST2020-03-16T12:12:32+5:302020-03-16T12:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : घरासमोर आरडाओरड करून टिंगलटवाळी का करतात अशी विचारणा केल्याचा राग येऊन शहरातील गरीब-नवाज कॉलनीत ...

शहाद्यात दोन गटात हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : घरासमोर आरडाओरड करून टिंगलटवाळी का करतात अशी विचारणा केल्याचा राग येऊन शहरातील गरीब-नवाज कॉलनीत दोन गटात हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्यांसह कुºहाडीचा वापर करून हल्ला करण्यात आल्यामुळे तीन जण जखमी झाले. शहादा पोलिसात याबाबत परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून सात संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील गरीब-नवाज कॉलनीत रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास न्यू नशीब मेन्स पार्लर या सलून दुकानावर वसीम पठाण यांचा लहान भाऊ आदील हा कटींग करण्यासाठी गेला होता. तेथे ओट्यावर मित्रांसह बसलेला असताना दुकानासमोर रहाणाऱ्या मजाज पिंजारी याने त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. आमच्या भावाला शिवीगाळ का केली अशी विचारणा वसीम पठाण करायला गेले असता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कुºहाडीने डोक्यास गंभीर दुखापत केली. यात वसीम खान पठाण हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वसीम यांच्या फिर्यादीवरुन मजाज बशीर पिंजारी, इमरान शाहीद पिंजारी व नसीमबी शाहीद पिंजारी या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तर दुसरी फिर्याद इम्रान पिंजारी याने दिली असून त्यात म्हटले आहे की, रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास माझी आई नसीमबी पिंजारी ही घरात साफसफाई करीत असताना ओट्यावर आली असता तेथे काही युवक टिंगल-टवाळी व आरडाओरड करीत होते. आम्ही त्यांना तेथून हटकले. याचा राग येऊन वसीम खान पठाण व अनस खाटीक या दोघांनी माझ्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराशेजारील गटारीत ढकलले. त्याचवेळी माझे मामा मजाज पिंजारी हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना वसीम व अनसने कुºहाडीने मारहाण करून जखमी केले. यात इमरान पिंजारी व नसीमबी पिंजारी हे दोन्ही जखमी झाले आहेत. दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत इम्रानने दिलेल्या फिर्यादीनुसार वसीम अक्रम पठाण, अनस खाटीक, आदिल पठाण व अक्रम पठाण या चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक विक्रांत कचरे हे करीत आहेत.