शहाद्यात दोन ठिकाणी वीज चोरी उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:36 IST2019-11-04T13:36:21+5:302019-11-04T13:36:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरात वीज कंपनीच्या पथकाच्या कारवाईत दोन ठिकाणी वीज चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत़ ...

शहाद्यात दोन ठिकाणी वीज चोरी उघडकीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरात वीज कंपनीच्या पथकाच्या कारवाईत दोन ठिकाणी वीज चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत़ दोन वर्षापासून वीज चोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल झाला आह़े
वीज कंपनीचे सहायक अभियंता संजीत खंडू पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात शहरातील शिवराम मंदीर रोडवरील फिरोजखान हमीदखान पठाण या ग्राहकाच्या वीज मीटरची तपासणी केली होती़ तपासणीत वीज मीटर मंद गतीने सुरु असल्याचे दिसून आल्यानंतर तपासणीसाठी काढून घेतले होत़े
दरम्यान पथकाने डोंगरगाव रोडवरील विजय उद्धव भामरे यांच्या राहत्या घरातील वीज मीटर संथ गतीने सुरु असल्याचे दिसून आले होत़े येथे तपासणी करुन मीटर ताब्यात घेतले होत़े दोन्ही ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या मीटर तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर फिरोजखान पठाण याने दोन वर्षात 3 हजार 31 युनिट तर विजय भामरे या वीज ग्राहकाने 3 हजार 220 युनिट वीज चोरी केल्याचे उघड झाले होत़े यातून कंपनीने दोघांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता़ याप्रकरणी संजीत पाटील यांनी शनिवारी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन फिरोजखान याच्याविरोधात आणि विजय उद्धव भामरे व इंदूबाई उद्धव भामरे या दाम्पत्यविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवी करत आहेत़