शहाद्यात दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:04 IST2019-11-05T13:04:27+5:302019-11-05T13:04:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मागील भांडणाची कुरापत काढून शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री 11 ...

शहाद्यात दोन गटात तुफान हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मागील भांडणाची कुरापत काढून शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती़ घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याने 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन 11 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतल़े
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सप्तशृंगी मंदिराजवळील चौकात पिरण मोरे, धनराज ईशी, दिनेश निकुंभे, सचिन मोरे, अश्विन मोरे, गुड्ड ईशी, वैभव चव्हाण, अश्विन मोरे, कल्पेश ईशी, पंकज घोडसे, भूषण वाघमारे, शुभम चव्हाण, प्रकाश चव्हाण, विश्वजित भामरे, दिनेश निकुंभे, रवी मोरे सर्व रा़आंबेडकर चौक यांनी मागील भांडणाची कुरापत काढून कृष्णा गुलाब सोनवणे व नितीन चौधरी यांना लाठय़ा-काठय़ा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती़ रात्री घडलेल्या या घटनेनंतर सर्व संशयितांविरोधात कृष्णा सोनवणे याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता़
दरम्यान रात्री उशिरा दुस:या गटातील बाबा वडर उर्फ कृष्णा गुलाब सोनवणे रा.साईबाबा नगर, निखिल चौधरी रा.लोणखेडा यांनी भांडणाची कुरापत काढून पिरण मोरे यास लाकडी दांडक्याने व फायटरने जबर मारहाण करीत दुखापत केली़ शहरातील हॉटेल अनिल पॅलेसजवळ ही घटना घडली़ याप्रकरणी पिरण मोरे याच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास उपनिरीक्षक राजेश पाटील व विक्रांत कचरे करत आहेत़
मारहाणीदरम्यान एका गटाने दुस:या गटातील एकाची दुचाकीची तोडफोड करत पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता़ पोलीस निरीक्षक किसनराव नजनराव पाटील यांनी रात्रभर गस्त संशयितांची धरपकड केली होती़
दोन्ही गटातील हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भदाणे, सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळाल्यानंतर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले होत़े त्यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रय} केला असता, पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली़ याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल भरत बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांनी धनराज ईशी, अश्विन मोरे, वैभव चव्हाण, पंकज घोडसे, भूषण वाघमारे, शुभम चव्हाण, प्रकाश चव्हाण, विश्वजित भामरे, कृष्णा सोनवणे व निखिल चौधरी यांना अटक केली होती़ सोमवारी त्यांची नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आह़े