शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागील खऱ्या सूत्रधारांना अटक करा, जिल्ह्यात अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:28+5:302021-08-22T04:33:28+5:30

नंदुरबार शाखेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तपासात होणाऱ्या दिरंगाईबाबत अंनिसच्या शाखेकडून निषेध सत्याग्रह करण्यात आला व डॉ. दाभोलकरांना ...

Martyr Dr. Arrest the real masterminds behind the murder of Narendra Dabholkar, Annis's statement to the tehsildar in the district | शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागील खऱ्या सूत्रधारांना अटक करा, जिल्ह्यात अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागील खऱ्या सूत्रधारांना अटक करा, जिल्ह्यात अंनिसचे तहसीलदारांना निवेदन

नंदुरबार शाखेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तपासात होणाऱ्या दिरंगाईबाबत अंनिसच्या शाखेकडून निषेध सत्याग्रह करण्यात आला व डॉ. दाभोलकरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाखेचे सूर्यकांत आगळे, वसंत वळवी, मीनाक्षी आगळे, बलदेव वसईकर, अनंत सूर्यवंशी, विजय अहिरे, दीपक चौधरी, कीर्तिवर्धन तायडे व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

तळोदा तहसीलदारांना निवेदन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तोडगा शाखेच्या वतीने तळोद्याचे तहसीलदार गिरीश वाखारे यांना निवेदन देऊन खुनामागील सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. नंदुरबार जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष डॉ. देवीदास शेंडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे प्रा.डॉ. प्रशांत बोबडे, तळोदा शाखेचे कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, जयश्री महाले, अमोल पाटोळे आदींच्या निवेदनावर सह्या होत्या.

शहादा येथे तहसीलदारांना निवेदन

शहादा अंनिसच्या शाखेनेही तहसीलदारांना शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागील खऱ्या सूत्रधारांना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष हैदरअली नुरानी, माजी उपाध्यक्ष शशांक कुलकर्णी, साहित्यिक डॉ. अलका कुलकर्णी, वनिता पटले, चुनीलाल ब्राह्मणे, राज्य सरचिटणीस विनायक साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, संतोष महाजन, प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.

Web Title: Martyr Dr. Arrest the real masterminds behind the murder of Narendra Dabholkar, Annis's statement to the tehsildar in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.