मंगल कार्यालये होणार खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:23 IST2020-06-25T12:23:32+5:302020-06-25T12:23:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंगल कार्यालये, खुले लॉन्स तसेच सभागृहांमध्ये ५० जणांच्या मर्यादेत विवाह समारंभांना सशर्त परवाणगी देण्यात ...

Mars offices will be open | मंगल कार्यालये होणार खुली

मंगल कार्यालये होणार खुली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंगल कार्यालये, खुले लॉन्स तसेच सभागृहांमध्ये ५० जणांच्या मर्यादेत विवाह समारंभांना सशर्त परवाणगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले.
गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे तसेच कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मंगल कार्यालये, लॉन्स, सभागृहे या ठिकाणी विवाह समारंभांवर बंदी घालण्यात आली होती. आता अनलॉकडाऊन सुरू झाल्याने काही बाबींना परवाणगी दिली जात आहे. त्याअंतर्गत आता लॉन्स व मंगल कार्यालयांमध्ये अटी शर्तीला अधीन राहून तत्वत: परवाणगी देण्यात येणार आहे.
खुले लॉन, विना वातानुकूलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह किंवा घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन तसेच कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्नसमारंभ पार पाडण्यासासाठी नागरिकांकडून मागणी आल्यास त्यास परवानगी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारी नंदुरबार, शहादा व तळोदा आणि कार्यकारी दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर नवापुर, अक्कलकुवा, अक्राणी यांनी त्यांच्यास्तरावरून ही परवानगी द्यावी आणि परवानगी दिलेल्या लग्नसमारंभाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Mars offices will be open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.