तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:45 IST2020-03-14T12:44:46+5:302020-03-14T12:45:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीन लाख रुपये माहेरून आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जालना येथील सासरच्या मंडळींविरुद्ध उपनगर ...

Married torturer for three lakhs | तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तीन लाख रुपये माहेरून आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जालना येथील सासरच्या मंडळींविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील माहेर असलेली विवाहिता वैशाल मनोजसिंग चव्हाण यांचा किनोला, जि.जालना येथील सासरची मंडळी २०१६ पासून छळ करीत होती. तीन लाख रुपये आणावे यासाठी मारहाण केली जात होती. छळाला कंटाळून वैशाली चव्हाण यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून पती मनोजसिंग बद्रीसिंग चव्हाण यांच्यासह रामसिंग बद्रसिंग चव्हाण, निर्मलाबाई बद्रीसिंग चव्हाण, प्रतिक बद्रीसिंग चव्हाण सर्व रा.किनोल, ता. बदलापूर, जि.जालना, राजश्री महेंद्रसिंग परदेशी रा.हिंगोली, जयश्री सुनील परदेशी रा.पुणे व पूजा दिपकसिंह परदेशी रा.लळींग, धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास महिला पोलीस उपनिरिक्षक गायकवाड करीत आहे.

Web Title: Married torturer for three lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.