भोमदीपाडा येथे विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:29 IST2019-09-22T12:29:01+5:302019-09-22T12:29:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : पतीसोबत पटत नसल्याने रागाच्या भरात एका विवाहित महिलेने तेथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची ...

भोमदीपाडा येथे विवाहितेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : पतीसोबत पटत नसल्याने रागाच्या भरात एका विवाहित महिलेने तेथील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची भोमदीपाडा, ता.नवापूर घटना 20 सप्टेंबर रोजी घडली.
पोलीस सूत्रांनुसार, सनम आबेसिंग गावीत (20) या विवाहित युवतीचे तिच्या पतीसोबत पटत नव्हते दोघांचेही मतभेद होते. रागाच्या भरात युवतीने भोमदीपाडा गावाजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.