जनता कर्फ्यूमुळे तळवे आणि पिंपळोद येथे मध्यरात्रीच लावला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:22 IST2020-03-22T11:06:59+5:302020-03-22T11:22:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/नंदुरबार : आयुष्यातून एकदाच येणारा विवाहाच्या क्षणाचा आनंद बाजूला ठेवत तळवे ता़ तळोदा येथील केदार कुटूंबियांनी ...

जनता कर्फ्यूमुळे तळवे आणि पिंपळोद येथे मध्यरात्रीच लावला विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार/नंदुरबार : आयुष्यातून एकदाच येणारा विवाहाच्या क्षणाचा आनंद बाजूला ठेवत तळवे ता़ तळोदा येथील केदार कुटूंबियांनी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला साद देत शनिवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनीटांनी विवाह सोहळा आटोपून घेत जनजागृतीत सहभाग नोंदवला़ विवाह २२ रोजी दुपारी १२ वाजेचा असताना जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला़
२२ मार्च रोजी तळवे ता़तळोदा येथील ग्राम पंचायत सदस्य सुरेश नारायण केदार व यांचा मुलगा दिपक केदार यांचा विवाह मोड ता़ तळोदा येथील नाना उंदा सूर्यवंशी यांची कन्या सपना यांच्यासोबत निश्चित करण्यात आला होता़ दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशातील नागरिकांनी जनता कर्फ्यूत सहभागी होऊन कोरोनामुक्त भारत करण्याचे आवाहन केले होते़ कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला तळवे ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता़ यातच तळवे येथे विवाह असल्याची माहिती सरपंच दशरथ बारीकराव, पोलिस पाटील भरत पटेल यांना मिळाल्यानंतर त्यांनी सुरेश केदार यांची भेट घेत माहिती दिली़ केदार कुटूंबांनेही यावर प्रतिसाद देत मध्यरात्री विवाह लावण्याचा निर्णय घेतला होता़ यावेळी आरोग्य सेविका सुरेखा वळवी आणि प्रताप वळवी यांनी मध्यस्थी केली होती़ केदार कुटूंबिय, नवरीकडील मंडळी तसेच गावात माहिती देऊन रविवारी मध्यरात्री विवाह सोहळा उरकला़ विशेष म्हणजे यावेळी आरोग्यसेविका सुरेखा वळवी आणि नवरदेव आणि नवरी यांनी उपस्थितांना कोरोनापासून बचाव करण्याचा सल्ला देऊन हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले ़ यावेळी दोन्ही कुटूंबियांचे निवडक नातेवाई, नातेवाईक,गावातील प्रतिष्ठित नागरिक,व समाज बांधव असे केवळ ५० नागरिक उपस्थित होते़
खैरवे ता़ शहादा येथील वर सुधीर भिमराव निकुंभ व पिंपळोद ता़ निझर येथील योगिता देविदास सामुद्रे यांचा विवाह रविवार २२ मार्च रोजी पिंपळोद येथे विवाह होणार होता़ परंतू जनता कर्फ्यूमुळे वधू वराकडील मंडळींनी हळदी समारंभातच शनिवारी रात्री विवाह उरकून घेतला़ यावेळी मोजकेच वºहाडी मंडळी उपस्थित होते़ निकुंभे व सामुद्रे परिवाराच्या या निर्णयाचा समाजात व पंचक्रोशीत स्वागत करण्यात आला़