तीन वेगवेगळ्या घटनेत विवाहितांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:39 IST2019-12-19T11:39:36+5:302019-12-19T11:39:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात माहेर असलेल्या तीन विवाहितांचा वेगवेगळ्या ठिकाणी पैश्यांसाठी शारिरिक व मानसिक छळ झाल्याने त्यांच्याकडून ...

तीन वेगवेगळ्या घटनेत विवाहितांचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात माहेर असलेल्या तीन विवाहितांचा वेगवेगळ्या ठिकाणी पैश्यांसाठी शारिरिक व मानसिक छळ झाल्याने त्यांच्याकडून दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ अक्कलकुवा, शहादा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत़
अक्कलकुवा
शहरातील माहेर व सिरोही (राजस्थान) येथील सासर असलेल्या जयश्री सौरभ देवडा या विवाहितेचा पती डॉ़ सौरभ धनराज देवडा, सासरे धनराज शंकरलाल देवडा, सासू इंदू, निहा राकेश सेन सर्व रा़ सिरोही तसेच ललित पवार व बेबी रामेश्वर सेन रा़ पिपाड (राजस्थान) यांनी छळ केला़ जानेवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान त्यांनी पैशांची मागणी करत त्रास दिला़ विवाहितेच्या फिर्यादीवरुन सर्व पाच संशयितांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहादा
शहादा येथील हिना कौसर सादिक यांचा सेंधवा येथील सासरी पती सादीक खान अजीज खान, सासरे अजीजखान रहिम खान, तय्यब अजीजखान, शाहरुख खान, साबीरखान यांनी माहेरुन दीड लाख आणावेत यासाठी छळ केला़ आॅगस्ट २०१४ ते डिसेंबर २०८ यादरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरुन सर्व पाच जणांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नंदुरबार
तालुक्यातील चौपाळे येथील माहेर असलेल्या प्रियंका केतन तेलवणे यांचा पती केतन तेलवणे, सागर तेलवणे, पूजा तेलवणे, साक्षी तेलवणे, नितीन तेलवणे, मिनाबाई तेलवणे व मिना मोरे रा़ बदलापूर जि़ ठाणे यांनी छळ केला़ तसेच या दरम्यान बळजबरीने गर्भपात घडवून आणला़ जून ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत प्रियंका यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़