नवीन घर घेण्यासाठी पैैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:24 IST2019-04-11T12:24:50+5:302019-04-11T12:24:55+5:30
शहरातील माहेर : सासरच्यांविरोधात गुन्हा

नवीन घर घेण्यासाठी पैैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ
नंदुरबार : नवीन घर घेण्यासाठी तीन लाख रुपये आणावेत यासाठी पातोंडा शिवारातील माहेर असलेल्या विवाहितेचा सुरत येथे छळ करण्यात आला़ विवाहितेच्या फिर्यादीवरुन सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गायत्री आशिष ऊर्फ दिवेश पटेल रा़ पंकज पार्क पातोंडा शिवार, नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती आशिष श्रीधर पटेल, सासरे श्रीधर हिरजी पटेल, दीर जयेश श्रीधर पटेल सर्व रा़ उधना, सुरत यांनी मे २०१७ ते एप्रिल २०१९ या काळात नवीन घरासाठी पैश्यांची मागणी केली होती़ माहेरुन तीन लाख रुपये आणवेत यासाठी त्यांच्यावर दबाव टाकून वेळोवेळी शिवीगाळ करुन शारिरिक व मानसिक छळ करण्यात येत होता़
विवाहितेने नंदुरबार येथील माहेरी येऊन कुटूंबियांना या बाबीची माहिती दिली होती़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पती आशिष, सासरे श्रीधर आणि दीर जयेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़