पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:57 IST2019-07-03T11:57:15+5:302019-07-03T11:57:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापड दुकान खरेदीसाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी ...

Marriage for five lacs | पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कापड दुकान खरेदीसाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आह़े आठ वर्षापासून हा प्रकार सुरु होता़ 
शहरातील माहेर असलेल्या  इकरा जुबेर शेख यांचा पती जुबेर अब्दुल रहेमान शेख, खालेदा अब्दुल रेहमान शेख, इलियास अब्दुल रहेमान शेख, उमेज अब्दुल मतीन सर्व रा़ खंडवा यांच्याकडून आठ वर्षापासून छळ सुरु होता़ दरम्यान चौघांनी          त्यांचे दागिने काढून घेत शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ 5 एप्रिलर्पयत सुरु असलेल्या प्रकाराला कंटाळून विवाहिता इकरा ह्या माहेरी आल्या होत्या़ 
30 जून रोजी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती जुबेर, सासू खालेदा, दीर इलियास, उमेज यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सैंदाणे करत आहेत़ 
पाचोरा येथे विवाहितेचा छळ 
पाचारो जि़ जळगाव येथील सासर आणि नंदुरबार शहरातील हुडको कॉलनीतील माहेर असलेल्या दिप्ती योगेश पाटील यांचा पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून छळ सुरु होता़ वेळोवेळी चारित्र्यावर संशय घेत शारिरिक व मानसिक छळ करण्यात आला़ 15 ऑगस्ट 2018 पासून हा प्रकार सुरु होता़ 
विवाहिता माहेरी आल्यानंतरही हा प्रकार सुरु होता़ याप्रकरणी दिप्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती योगेश विठ्ठल पाटील, सासू रमाबाई विठ्ठल पाटील, दीर दिपक विठ्ठल पाटील व प्रशांत विठ्ठल पाटील यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गावीत करत आहेत़ 
 

Web Title: Marriage for five lacs