तळोद्यात पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:35 IST2019-03-10T12:34:52+5:302019-03-10T12:35:09+5:30

नंदुरबार : पहिली पत्नी हयात असतानाही दुसऱ्या महिलेसोबत विवाह करुन पहिल्या पत्नीचा छळ केल्याने पतीविरुद्ध तळोदा पोलीसात गुन्हा दाखल ...

The marriage of another woman in Paltod, the first woman | तळोद्यात पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी विवाह

तळोद्यात पहिली पत्नी असताना दुसऱ्या महिलेशी विवाह

नंदुरबार : पहिली पत्नी हयात असतानाही दुसऱ्या महिलेसोबत विवाह करुन पहिल्या पत्नीचा छळ केल्याने पतीविरुद्ध तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला़
देविदास फाड्या पावरा मूळ रा़ अंबापूर ता़ शहादा याचा विवाह अनिताबाई पावरा यांच्यासोबत आॅक्टोबर २०१६ मध्ये झाला होता़ दरम्यान प्रतापपूर ता़ तळोदा येथे राहत असताना देविदास याने दुसरा विवाह करुन घेत पहिली पत्नी अनिताबाई हिचा छळ सुरु केला़ यात देविदास हा अनिताबाई यांच्याकडून वारंवार पैश्यांची मागणी करत होता़ पैसे न प्रतापपूर व औरंगाबाद येथे त्यांना मारहाण करण्यात आल्याचे प्रकार झाले़
यातून अनिताबाई यांनी गुरुवारी तळोदा पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिल्यानंतर देविदास पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत़

Web Title: The marriage of another woman in Paltod, the first woman