हुंडय़ासाठी विवाहितेला मारहाण व विनयभंग
By Admin | Updated: May 27, 2017 15:27 IST2017-05-27T15:27:39+5:302017-05-27T15:27:39+5:30
एक लाखाची मागणी : मोहिदे येथील महिलेची फिर्याद

हुंडय़ासाठी विवाहितेला मारहाण व विनयभंग
>ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.27 - शहादा तालुक्यातील मोहिदा येथील माहेर व इंदवे ता़ साक्री येथील सासर असलेल्या विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्यांविरोधात एक लाख रुपयांचा हुंडय़ासाठी त्रास देऊन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
मोहिदे येथील 20 वर्षीय युवतीचा विवाह रवींद्र अंबर इंदिस याच्यासोबत झाला होता़ गेल्या 20 एप्रिल रोजी रवींद्र याने मोहिदे येथे जाऊन पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली़ यावेळी अडवण्यासाठी आलेल्या शालकास मारहाण केली़ यावेळी रवींद्र व त्याचे वडील अंबर मणा इंदिस, जेठ विनोद व गोकूळ भाईदास इंदिस यांनी किराणा दुकानासाठी एक लाख रूपये न दिल्यास फारकात देण्याची धमकी दिली़ मारहाणीदरम्यान विवाहितेचे स्त्रीधन हिसकावून विनोद इंदिस याने तिच्यासोबत अश्लील भाषेत शिविगाळ करीत तिचा विनयभंग केला तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ विवाहितेच्या फिर्याच्या फिर्यादीवरून पती रवींद्र, सासरे अंबर, सासू लताबाई, जेठ विनोद इंदिस यांच्यासह सुभाष पुंडलिक इंदिस व गोकूळ इंदिस यांच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े