शहाद्यात तिसऱ्या दिवशीही शासकीय कार्यालये व बँका वगळता बाजारपेठ बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:27 IST2020-07-08T12:27:05+5:302020-07-08T12:27:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रशासनाने ८ जुलैपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या तिसºया दिवशी नागरिकांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक ...

Markets closed except for government offices and banks on the third day of martyrdom | शहाद्यात तिसऱ्या दिवशीही शासकीय कार्यालये व बँका वगळता बाजारपेठ बंद

शहाद्यात तिसऱ्या दिवशीही शासकीय कार्यालये व बँका वगळता बाजारपेठ बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात प्रशासनाने ८ जुलैपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या तिसºया दिवशी नागरिकांचा बºयापैकी प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा, शासकीय कार्यालय व बँकेचे कामकाज सुरू असले तरी येथे तुरळक प्रमाणात गर्दी होती. शासकीय कार्यालयांमध्ये येणाºया प्रत्येक नागरिकांची नोंद केल्यानंतर त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जात होता. मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट असला तरी वसाहतींमध्ये मात्र नागरिक घोळक्याने जमत असल्याने त्यांना पांगवण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती.
शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कोरोना विषाणू बाधीत रूग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाने खबरदारीचा व तातडीचा उपाय म्हणून शहादा शहर व लोणखेडा परिसरात ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मंगळवारी तिसºया दिवशी शहरातील सर्व व्यवहार बंद होते. शासकीय कार्यालय व बँकांचे कामकाज सुरू असले तरी याठिकाणी नागरिकांची गर्दी तुरळक प्रमाणात होती. तालुक्यातील म्हसावद, दामळदा, तोरखेडा, डामरखेडा व प्रकाशा या गावांमध्ये नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला आहे.
पोलीस, महसूल व पालिका प्रशासनातर्फे शहरात रिक्षा फिरवून नागरिकांनी लॉकडाऊन कालावधीदरम्यान घरातच राहावे, विनाकारण बाहेर फिरू नये, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात असले तरी अनेक वसाहतींमध्ये मात्र सायंकाळच्या सुमारास नागरिक घोळक्याने जमत आहेत. पोलिसांची गाडी आली की पळायचे, गाडी गेली की पुन्हा जमायचे अशी परिस्थिती दिसून येत होती. प्रशासनाने जाहीर केल्याच्या सक्तीच्या लॉडाऊनचे समर्थन सुज्ञ नागरिकांनी केले असले तरी हातावर पोट असलेल्या व्यावसायिक आता आम्ही करायचे काय? अशा विवंचनेत होते.
सुदैवाने ३ जुलैनंतर कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नसली तरी प्रशासनाने वैद्यकीय तपासणीसह चाचण्यांची संख्या या लॉकडाऊनदरम्यान वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे नमुने घेतल्यानंतर त्याचा अहवाल लवकर जाहीर करावा यामुळे संभाव्य बाधीत रुग्ण इतरांच्या संपर्कात येणार नाही तसेच लॉकडाऊनचा उद्देश सफल होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

कोरोनासारख्या महामारीत प्रशासन अनेक खबरदारीचे उपाय घेऊन सामना करीत आहे. परंतु काही नागरिक लॉकडाऊन असतानाही केवळ शिथिलतेचा गैरफायदा घेण्यात धन्य समजत आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून फक्त महत्त्वाच्या कामासाठीच बाहेर निघण्याच्या सूचना प्रशासन करीत असताना युवा वर्ग मात्र आपल्याच मौजेत वावरत आहेत. विडी, सिगरेट, गुटका व दारू कुठे मिळेल याच्या शोधात युवा वर्गासह अनेक नागरिक विनाकारण मोटारसायकल घेऊन शहरातील अनेक भागांमध्ये फिरत आहेत याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे.

Web Title: Markets closed except for government offices and banks on the third day of martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.