बाजारात खरीप ज्वारीने दिली पाच हजार क्विंटलची सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:38 IST2019-11-02T12:38:28+5:302019-11-02T12:38:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवाळीत बंद असलेला धान्य आणि भाजीपाला अखेर सुरु झाला आह़े यातून पहिल्याच दिवशी मिरचीची ...

In the market, kharif tide gives five thousand quintals of salute | बाजारात खरीप ज्वारीने दिली पाच हजार क्विंटलची सलामी

बाजारात खरीप ज्वारीने दिली पाच हजार क्विंटलची सलामी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवाळीत बंद असलेला धान्य आणि भाजीपाला अखेर सुरु झाला आह़े यातून पहिल्याच दिवशी मिरचीची 700 तर ज्वारीची तब्बल 5 हजार क्विंटल आवक झाली आह़े  ढगाळ वातावरण आणि झालेला अवकाळी पाऊस यामुळे हताश झालेल्या शेतक:याला बाजाराने उभारी दिली असून मालाचे चांगले दर मिळाल्याने समाधान व्यक्त होत होत़े     
एकीकडे नंदुरबार बाजारात सात दिवसांनंतर सुरु झालेल्या बाजारात शेतमालाची आवक सुरु असताना जिल्ह्यातील दुसरी प्रमुख बाजारपेठ असलेल्या शहादा बाजार समितीत मात्र शुकशुकाट होता़ याठिकाणी मका आणि सोयाबीनची तुरळक आवक असून पावसामुळे शेतक:यांचा माल खराब झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े  
दरम्यान शुक्रवारी सकाळी नंदुरबार बाजार समितीत खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु झाल्यानंतर सर्वात प्रथम ज्वारीची आवक सुरु झाली होती़ दिवसभरात 260 वाहनांद्वारे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या शेतक:यांनी ज्वारी येथे विक्रीसाठी आणली होती़ या मालाला व्यापा:यांनी पसंती दिल्यानंतर लिलाव सुरु करण्यात आले होत़े सायंकाळी उशिरार्पयत बाजारात आलेल्या ज्वारीची मोजदाद करुन शेतक:यांना खरेदीचे पैसे देत होत़े 

बाजार समितीच्या आवारात आवक झालेल्या ज्वारीला प्रतिक्विंटल 1 हजार 800 ते 2 हजार 100 रुपयांर्पयत दर देण्यात आले होत़े यात चांगल्या दर्जाच्या ज्वारीला व्यापा:यांनी तब्बल 2 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल दर दिल्याची माहिती देण्यात आली आह़े दिवसभरात तब्बल पाच हजार क्विंटल आवक झाल्याने दिवाळीपूर्वी झालेल्या आवकनुसार बाजार समितीत आतार्पयत 10 हजार क्विंटल ज्वारी आल्याचे सांगण्यात आले आह़े ज्वारीपाठोपाठ 1 हजार क्विंटल मकाही शेतक:यांकडून व्यापा:यांनी खरेदी केला़ त्याला 1 हजार 800 प्रतिक्विंटल दर देण्यात आला़ 
पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेतक:यांच्या चिंता वाढवणा:या मिरचीची 1 हजार 800 ते 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दरात खरेदी करण्यात आली़ प्रामुख्याने लाली, व्हीएनआर या मिरचीला हे दर मिळाले तर तेजा या वेगळ्या वाणाला 3 हजार 200 ते 3 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आल़े शनिवारी बाजारात मिरची आवक होणार आह़े यातून यंदा नोव्हेंबर मध्यताच मिरची हंगाम 60 हजार क्विंटलपार जाण्याची शक्यता आह़े 

सोयाबीन आणि मका उत्पादनाला चांगला भाव देणा:या शहादा बाजार समितीत धान्याची आवक मंदावली आह़े गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात येथे 12 हजार क्विंटल आवक होती़ परंतू यंदा ऑक्टोबर संपल्यानंतर केवळ 2 हजार 500 क्विंटल सोयाबीन आला आह़े व्यापा:यांनी 3 हजार 800 रुपये प्रतीक्विंटल दर देऊन आवक नसल्याचे सांगण्यात आल़े शहादा तालुक्यात गेल्या महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन खराब झाल्याने शेतक:यांनी त्याची परस्पर विक्री केली होती़ यामुळे येथील आवक घसरली़ 
4एकीकडे धान्य व कडधान्य बाजार सुरु झाला असताना कापूस मार्केट बंदच आह़े सीसीआयसोबतच बाजार समितीचे खरेदी केंद्र पुढील आठवडय़ापासून सुरु होण्याची शक्यता आह़े 
 

Web Title: In the market, kharif tide gives five thousand quintals of salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.