सलग चार दिवस बंद राहिली बाजार समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:27 IST2020-08-25T12:27:15+5:302020-08-25T12:27:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजार समितीच्या नवीन कायद्याला विरोधासाठी आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समिती बंद पुकारला ...

सलग चार दिवस बंद राहिली बाजार समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीच्या नवीन कायद्याला विरोधासाठी आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समिती बंद पुकारला होता. त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, शुक्रवारपासून सलग चार दिवस बाजार समिती बंद राहिल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
नवीन बाजार समिती कायद्यामुळे व्यापाºयांमध्ये असंतोष आहे. त्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकरीता नंदुरबारातील व्यापारी महाजन असोसिएशन, नंदुरबार ग्रेन मर्चंट असोसिएशन यांच्यासह व्यापाºयांनी एक दिवसांचा लाक्षणीक बंद आयोजित केला होता. त्याला प्रतिसाद मिळाल्याने बाजार समिती आवारात शुकशुकाट होता.
शुक्रवारी बाजार समिती आणि कर्मचाºयांनी या कायद्याला विरोध म्हणून बंदचे आयोजन केले होते. त्यानंतर शनिवार व रविवार बाजार समितीला सुट्टी होती. सोमवारी व्यापाºयांनी बंद आयोजित केला होता. त्यामुळे सलग चार दिवस बाजार समिती बंद असल्याने शेतकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. सोमवारी काही शेतकरी शेतमाल घेऊन देखील आले होते. त्यांना परत जावे लागले.