घटस्थापनेसाठी बाजार गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 11:51 IST2019-09-29T11:51:28+5:302019-09-29T11:51:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गत 15 दिवसांपासून संथावलेल्या बाजाराला घटस्थापनेच्या पूर्व संध्येला गती मिळाली़ शनिवारी दिवसभरात बाजारात नागरिकांकडून ...

घटस्थापनेसाठी बाजार गजबजला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गत 15 दिवसांपासून संथावलेल्या बाजाराला घटस्थापनेच्या पूर्व संध्येला गती मिळाली़ शनिवारी दिवसभरात बाजारात नागरिकांकडून घटस्थापनेसाठी लागणा:या साहित्याची खरेदी करण्यात आल्याने उलाढाल वाढली होती़
पूजा साहित्यासह, माती घट आणि इतर साहित्याच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून नागरिक शनिवारी बाजारात आले होत़े प्रामुख्याने सुभाष चौक आणि मंगळबाजारात गर्दी झाल्याचे दिसून आल़े को:या कापडासह रंगीबेरंगी चुनरी, नारळाची विक्री मोठय़ा प्रमाणावर झाल्याने विक्रेत्यांच्या चेह:यावर समाधान दिसून येत होत़े दरम्यान नवरात्रोत्सवात संसारोपयोगी साधने, वाहने आणि इतर वस्तूंची खरेदी विक्रीत वाढ होणार असल्याने शोरुम्स शनिवारपासून सज्ज झाल्याचे दिसून आल़े ठिकठिकाणी सजावट करण्यात येऊन रोषणाई करण्यात आल्याने बाजारात चैतन्य संचारले होत़े एकीकडे बाजारात गर्दी असताना सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली़ पाऊस थांबल्यानंतरही अनेक जण चिखलातून वाट काढत खरेदी करत होत़े
नवरात्रोत्सवापासून बाजारात ङोंडू फुलांची आवक होत़े शनिवारी दुपारपासून नंदुरबार शहरालगतच्या परिसरातून तसेच पश्चिम पट्टय़ातील गावांमधून ङोंडूची आवक झाली होती़ ही आवक तुरळक असल्याने 80 ते 100 रुपये किलोदराने केशरी आणि पिवळ्या ङोंडूची विक्री करण्यात येत होती़ संततधार पावसामुळे ङोंडूची झाडे तग धरत नसल्याने अनेकांना उत्पादनच आलेले नसल्याची स्थिती आह़े या परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे सांगण्यात आल़े येत्या काही दिवसात गुजरातसह साक्री तालुक्यातून ङोंडू आवक होणार असल्याने ङोंडूचे दर काहीसे कमी होती असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आल़े