मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 12:13 IST2020-12-28T12:13:21+5:302020-12-28T12:13:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मुलगी झाली म्हणून आणि घर बांधकामासाठी तीन लाख रुपये आणावे यासाठी महिलेचा छळ केल्याप्रकरणी ...

Marital harassment as a daughter was born | मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  मुलगी झाली म्हणून आणि घर बांधकामासाठी तीन लाख रुपये आणावे यासाठी महिलेचा छळ केल्याप्रकरणी खेड, जिल्हा पुणे येथील चार जणांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस सूत्रांनुसार, सारंगखेडा येथील भाग्यश्री डिगंबर माळी या महिलेचा खेड येथील डिगंबर भिला माळी यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना मुलगी झाली. त्यामुळे सासरची मंडळी नाराज होती. याच दरम्यान घर बांधकामासाठी तीन लाख रुपये आणावे यासाठीही तगादा लावला जात होता. त्यासाठी त्यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी सासरी मंडळी देत होती. त्याला कंटाळून भाग्यश्री यांनी फिर्याद दिल्याने डिगंबर भिला माळी, आशाबाई भिला माळी, कमलाबाई जगन्नाथ माळी, ज्योती अविनाश रासकर व अविनाश बबन रासकर सर्व रा.खेड, जि.पुणे यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रोहिदास सोनवणे करीत आहे. 

Web Title: Marital harassment as a daughter was born