वरणगावच्या विवाहितेचा शहाद्यात उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:30 IST2019-04-30T21:30:12+5:302019-04-30T21:30:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : माहेरी आलेल्या विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शहादा शहरातील तूपबाजारात घडली़ विवाहितेवर धुळे येथील ...

वरणगावच्या विवाहितेचा शहाद्यात उष्माघाताने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : माहेरी आलेल्या विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शहादा शहरातील तूपबाजारात घडली़ विवाहितेवर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु होत़े
जागृती सचिन सोनार (33) असे मयत विवाहितेचे नाव आह़े जागृती ह्या गेल्या आठवडय़ापासून वरणगाव जि़ जळगाव येथून माहेरी आल्या होत्या़ दरम्यान कामानिमित्त त्यांचे दुचाकीवरुन शहरात फिरणे होत होत़े यातच रविवारी त्यांची प्रकृती खराब झाली होती़ शहाद्यात उपचार केल्यानंतर त्यांना धुळे येथे हलवण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला़ त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी वरणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आल़े तूप बाजारातील दिलीप नथू सोनार यांची जागृती सोनार ही कन्या होती़ तिच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आह़े
गेल्या आठवडय़ात मुलाच्या जावळाचा कार्यक्रम आटोपून जागृती मुलांसह माहेरी आल्या होत्या़ उन्हात फिरल्याने ताप आल्याने प्रकृती खराब झाल्याने सोनार कुटूंबियांनी त्यांना तात्त्काळ रुग्णालयात दाखल केले होत़े परंतू डोक्यात तापाचा शिरकाव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आह़े