तळोद्यात एनआरसी विरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:41 IST2019-12-31T12:41:10+5:302019-12-31T12:41:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी तळोदा येथे विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. तेथे ...

तळोद्यात एनआरसी विरोधात मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : केंद्र शासनाच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी तळोदा येथे विविध संघटना रस्त्यावर उतरल्या. तेथे सहभागी नागरिकांमार्फत काळ्या फिती लावून तहसिल कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
तळोदा येथे मुस्लिम युवा मंच, भिलीस्थान टायगर सेना, माकपा, आदिवासी युवा शक्ती, राष्टÑीय मुस्लिम युवा मोर्चा, भिमशक्ती आदी संघटनांमार्फत मार्चा काढण्यात आला. मार्चात मुस्लीम समाजाध्यक्ष आरिफ नुरा शेख, माजी अध्यक्ष हाजी सरदार शेख उमराव, रईस अली अब्बास अली, इमरान अली, लियाकत अली, मोहसिन अजिज मणियार, मुख्तार शाह अब्बास शाह, रफिक भिका मणियार, रफिक हबीब मनियार, मौलाना शोएब रजा नुरी, मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे कॉ.जयसिंग माळी, भिलीस्थान टायगर सेनेचे राजू प्रधान, आदिवासी युवा शक्तीचे अरविंद पाडवी, विनोद माळी, राष्टÑीय मुस्लिम मोर्चाचे इमरान शेख आदी सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान मौलाना शोएब रजा नुरी यांनी स्मारक चौकात मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मोर्चाला बिरसा मुंडा चौकातून सुरुवात झाली. तेथून मेन रोड, बसस्थानक रोड, स्मारक चौक व हुतात्मा चौक या मार्गावरुन तहसिलपर्यंत नेण्यात आला. कचेरीत पंकज लोखंडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात एनआरसी, सीएए यांना संसदेतील विरोधी कक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून विरोध करण्यात आला असतानाही शासनामार्फत कायदा संमत करण्यात आला. त्यापाठोपाठ राज्यसभेत देखील बहुमताच्या जोरावर या कायद्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कायदा धोक्यात आला पर्यायाने देशातील जनसामान्यांचे जीवनलाही धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.