भाजपाचे अनेक पदाधिकारी झाले ‘चौकीदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 11:38 IST2019-03-20T11:38:34+5:302019-03-20T11:38:47+5:30

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने सुरू केलेल्या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने ‘मै भी चौकीदार’ ही मोहीम सुरू ...

 Many BJP office bearers became 'watchmen' | भाजपाचे अनेक पदाधिकारी झाले ‘चौकीदार’

भाजपाचे अनेक पदाधिकारी झाले ‘चौकीदार’

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसने सुरू केलेल्या मोहिमेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने ‘मै भी चौकीदार’ ही मोहीम सुरू केली असून त्याला प्रतिसाद देत नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावर ‘मै भी चौकीदार’च्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत.
सध्या सोशल मिडीयावर ‘मै भी चौकीदार’ची चर्चा जोरात सुरू झाली आहे. भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व सामान्य कार्यकर्त्यांनी एक विशिष्ट पोस्ट तयार करून त्या व्हायरल करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात भाजपाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील, नंदुरबार शहराध्यक्ष मोहन खानवाणी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील भाजपाचे दोन्ही आमदार व विद्यमान खासदार मात्र त्यापासून लांब आहेत.

Web Title:  Many BJP office bearers became 'watchmen'