आंबाडी भाजी साठविण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:05 IST2019-11-03T13:05:49+5:302019-11-03T13:05:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ातील आदिवासींमध्ये वर्षभर पूरेल एवढय़ा विविध भाज्यांचे संकलन करण्यात येते त्यात. प्रमुख ठरणारी आंबाडी ...

आंबाडी भाजी साठविण्याची लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ातील आदिवासींमध्ये वर्षभर पूरेल एवढय़ा विविध भाज्यांचे संकलन करण्यात येते त्यात. प्रमुख ठरणारी आंबाडी भाजीसाठी प्रत्येक परिवारात धावपळ सुरू झाली आहे.
गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील सर्व शेतजमिनी डोंगर-उतारावरच्या असल्यामुळे तेथील आदिवासी बांधवांना वर्षभर हिरव्या भाज्या उपलब्ध होत नाही. त्यांना केवळ पावसाळ्यात पिकणा:या भाज्यांचाच आधार घ्यावा लागतो. त्यानुसार हे बांधव पावसाळ्यातील भाज्या वर्षभर वापरण्यासाठी साठवून ठेवतात. त्यात दोन प्रकारची आंबाडी व अधिक आंबट असलेल्या आंबाडीच्या फळावरील साल या तीन भाज्या महत्वाच्या आहे. या तिन्ही भाज्या अनेक रोगांवर उपायकारक असून त्या वर्षभरासाठी सुकवून साठवण्याची परंपरा आहे. त्याशिवाय केवळ आदिवासींमध्येच आढळणारी शेंगवर्गिय भाजी, गावरान भेंडी, जंगलात मिळणारी फुले, फळे व पालापाचोळा यासह अनेक भाज्या तयार करीत आदिवासीं बांधवांमध्ये साठवण्याची धावपळ सुरू झाली आहे. सागाच्या पानामध्ये साठविल्याने चांगले राहत असते.