आंबा उत्पादनात यंदा झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:23 IST2020-05-11T12:23:07+5:302020-05-11T12:23:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी ...

आंबा उत्पादनात यंदा झाली घट
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे थंडी लांबणीवर गेली. नोव्हेंबर महिना संपला तरी पावसाचे प्रमाण काही प्रमाणात वाढले होते. त्यामुळे उशिरा थंडीला सुरूवात झाल्यामुळे आंब्याच्या झाडांना मोहोर प्रक्रिया कमी प्रमाणात सुरू झाली. परंतु आंबा हंगामावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून, उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी दिवाळीपासून थंडीला सुरूवात होते. मात्र गेल्या वर्षी थंडी लांबल्यामुळे मोहोर येण्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना करावी लागली होती. थंडीमुळे झाडावर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते. जवखेडा, ब्राह्मणपुरीसह रायखेड व परिसरातील काही शेतकºयांनी आपल्या शेताच्या बांधावर तर काही शेतकºयांनी आपल्या शेतात आंब्याची लागवड केली आहे. परंतु थंडी लांबल्याने शेतकºयांना मोहोराची प्रतिक्षा करावी लागली होती. गेल्यावर्षी वातावरणाचा असलेला असमतोल शिवाय अचानक थंडीत वाढ होणे व मध्येच अवकाळी पावसासह अचानक उष्मा वाढणे या सर्व घटनांमुळे मोहोर प्रक्रियेला अडचणी येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.
जवखेडा येथील कृषीभूषण शेतकरी हिरालाल ओंकार पाटील यांनी आपल्या शेतात एकूण एक हजार ते एक हजार १०० आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. त्यात रत्ना, हापूस, केशरी, सिंधू सीडलेस, कलमी आदी प्रकारच्या आंब्याची लागवड केली. दरवर्षी आंब्याना मोहर आल्यावर ३०० ते ४०० क्विंटल उत्पन्न येत असायचे. परंतु यावर्षी कमी प्रमाणात लांबणीवर गेलेल्या पावसामुळे तसेच बदलत्या वातावरणामुळे मोहर धारणा कमी प्रमाणात झाल्याने उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.