नवापूर परिसरातील मंगल कार्यालये लग्न मुहूर्ताच्या काळातही पडली ओस..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:33+5:302021-03-08T04:29:33+5:30
नवापूर तालुक्यातमध्ये कोरोणाचे रुग्णांची संख्या कमी जरी होत अस तरी नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने मुहूर्ताच्या काळात मंगल कार्यालये ...

नवापूर परिसरातील मंगल कार्यालये लग्न मुहूर्ताच्या काळातही पडली ओस..
नवापूर तालुक्यातमध्ये कोरोणाचे रुग्णांची संख्या कमी जरी होत अस तरी नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने मुहूर्ताच्या काळात मंगल कार्यालये नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती कायम असल्याने मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापक, मंडप सजावटवाले आणि कामगारांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत.
शासनाने नियमावलीमध्ये शिथिलता आणत मंगल कार्यालयांना ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात साखरपुडा अथवा विवाह समारंभाला परवानगी दिली आहे. परंतु दिवाळीच्या नंतर झालेल्या कोरोना रुग्णांच्या वृद्धीने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. दिवाळी अगोदर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेकांनी आपला सारखपुडा अथवा विवाह समारंभ उरकून घेण्याची तयारी दाखवली होती. यासाठी अनेक मंगल कार्यालयांत आगावू नोंदीसुद्धा झाल्या, परंतु दिवाळीनंतर अनेकांनी आपली नोंदणी रद्द करत आपले समारंभाचे तारीख पुढे ढकलले आहेत.
जोडधंद्यांवरही परिणाम.
लग्न सराईत चालणाऱ्या जोडधंद्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे, मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, जेवण बनविणारे कारागीर, मदतनीस अशा हजारो जणांना याचा फटका सहन करावा लागत आहे.आधीच लाँकडाऊनृच्या काळात काम नसल्याने आर्थिक फटका सहन करणारे हे व्यावसायिक येत्या काळात व्यवसाय नसल्याने हवालदिल झाले आहेत.