मंदाणे येथे ५५२ जणांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:46+5:302021-03-27T04:31:46+5:30

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील ४० ते ४५ खेडे गावांचे मध्यवर्ती ठिकाण व प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असलेल्या ...

In Mandane, 552 people were vaccinated | मंदाणे येथे ५५२ जणांनी घेतली लस

मंदाणे येथे ५५२ जणांनी घेतली लस

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील ४० ते ४५ खेडे गावांचे मध्यवर्ती ठिकाण व प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असलेल्या मंदाणे गावात कोरोना महामारीने पुन्हा शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १५ जण बाधित झाले असून, दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या आठवड्यापासून स्वॅब संकलन व लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक व तरूण वर्ग बेफिकिर व बिनधास्तपणे वावरताना, गर्दी करताना दिसून येत असल्याचे चित्र आहे.

अनेकांना सर्दी, खाेकला, ताप, घशाचा त्रास, अशी लक्षणे असताना नागरिक स्वॅब देण्यास पुढे येत नसल्याने स्वॅब संकलन मोहिमेस फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीतर्फे स्वॅब संकलन करण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.विशाल पाटील, डॉ.शैलेंद्र पाटील, आरोग्य सेविका सुनिता चव्हाण, योगिता मराठे, मंगला पगारे, दुर्गा मराठे, भारती निकम, बी.यु. जाधव, जे.डी. वसावे, बळीराम कोळी, अश्विनी पाटील हे परिश्रम घेत आहेत. योग्य वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे, ग्रामविकास अधिकारी डॉ.जितेंद्र पाटील, पाेलीस पाटील, सुभाष भील, माजी पंचायत समिती सदस्या सुषमा साळुंके, ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.

Web Title: In Mandane, 552 people were vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.