जागेच्या वादातून मनरदला चौघांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST2021-09-17T04:36:58+5:302021-09-17T04:36:58+5:30

नंदुरबार : घराच्या जागेच्या जुन्या वादातून चौघांनी एकास घरात घुसून मारहाण करीत घरातील सामान बाहेर ...

Manardala four beaten up over land dispute | जागेच्या वादातून मनरदला चौघांची मारहाण

जागेच्या वादातून मनरदला चौघांची मारहाण

नंदुरबार : घराच्या जागेच्या जुन्या वादातून चौघांनी एकास घरात घुसून मारहाण करीत घरातील सामान बाहेर काढत रस्त्यावर ठेवला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनरद येथील मनोज उद्धव पाटील व शिरुड, ता. शहादा येथील उमाकांत श्यामजी पाटील यांच्यात मनरद येथील घराच्या जागेचा वाद होता. त्या वादातून उमाकांत श्यामजी पाटील, सुरेखा उमाकांत पाटील रा. शिरुड, ता. शहादा व शोभा महेंद्र पटेल, महेंद्र पटेल, रा. उभद, ता. निझर यांनी १४ सप्टेंबर रोजी मनरद येथे येऊन मनोज पाटील यांच्या घरात प्रवेश केला.

त्यांना धक्काबुक्की करून चौघांनी आताच्या आता घर खाली कर म्हणून सांगत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मनोज पाटील यांच्या घरातील सामान बाहेर काढत रस्त्यावर ठेवले. पुन्हा घरात सामान ठेवले तर ठार मारू, अशी धमकीदेखील दिली. त्यानंतर धमकी देत चौघांनी घराला कुलूपदेखील लावले.

यामुळे घाबरलेल्या मनोज पाटील यांनी शहादा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध मारहाण व गृह अतिक्रमणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विलास पाटील करीत आहे.

दरम्यान, संशयितांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे गावासह पंचक्रोशीत एकच चर्चा सुरू आहे.

Web Title: Manardala four beaten up over land dispute