वाघर्डे येथे दारुबंदीला संमती देणाऱ्या वृद्धाला भर बैठकीत दोघांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:23 IST2020-01-22T12:23:42+5:302020-01-22T12:23:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दारुबंदीच्या ठरावासाठी बैठक सुरु असताना त्यास अनुमोदन देणाºया वृद्धास दोघांनी मारहाण केल्याची घटना वाघर्डे ...

वाघर्डे येथे दारुबंदीला संमती देणाऱ्या वृद्धाला भर बैठकीत दोघांकडून मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दारुबंदीच्या ठरावासाठी बैठक सुरु असताना त्यास अनुमोदन देणाºया वृद्धास दोघांनी मारहाण केल्याची घटना वाघर्डे ता़ शहादा येथे घडली़ मारहाणीत वृद्ध जखमी झाला आहे़
अस्तर जाहग्या मोते (६५) असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव असून रविवारी सायंकाळी अस्तर मोते हे पोलीस पाटील यांच्या घरासमोर दारुबंदीच्या ठरावासाठी सुरु असलेल्या बैठकीत बसले होते़ यावेळी त्यांनी दारुबंदीला अनुमोदन देत दारुबंदी व्हावी असा पवित्रा घेतला होता़ याचा राग आल्याने सुनिल लक्ष्मण जाधव व सुनील दिवाण सतवे दोन्ही रा़ वाघर्डे यांनी त्यांना लाकडी डेंगाºयाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात त्यांच्या बरगडीवर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सुनील जाधव व सुनील सतवे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपवास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़