मामाच्या गावी जाणा:या तरुणीवर बलात्कार : गेंदामाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 13:02 IST2018-04-16T13:02:48+5:302018-04-16T13:02:48+5:30
तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

मामाच्या गावी जाणा:या तरुणीवर बलात्कार : गेंदामाळ
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 16 : मामाच्या गावाला पायी जात असलेल्या तरुणीला एकटे गाठून तिच्यावर बलात्कार करणा:या गेंदामाळ, ता.धडगाव येथील युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तरुणीला युवकाने आठ दिवस दुस:या गावी देखील घेवून जावून अत्याचार केले.
धडगाव तालुक्यातील माळ (गेंदा), ता.धडगाव येथील 19 वर्षीय तरुणी 3 एप्रिल रोजी दुपारी पायवाटेने साव:यादिगर येथील मामाच्या गावाला जात होती. त्यावेळी भुषा ते बिलगाव रस्त्यावर गावातीलच भरत मोचडा पावरा या युवकाने गाठले. तिला जबरीने या रस्त्यावरील पुलाखाली घेवून जावून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीला दमदाटी करून तो धनाजे, ता.धडगाव व ब्राम्हणपुरी, ता.शहादा येथे घेवून गेला. तेथे देखील त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले.
तरुणीने बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला असता ती ब्राम्हणपुरी येथे आढळली. त्यानंतर तरुणीसह नातेवाकांनी 14 एप्रिल रोजी धडगाव पोलीस ठाणे गाठले. तेथे तरुणीने फिर्याद दिल्याने भरत मोचडा पावरा याच्याविरुद्ध बलात्कार व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास फौजदार ए.सी.मोरे करीत आहे. संशयीत आरोपी तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.