भाचीवर बलात्कार प्रकरणी मामाला सात वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:49 IST2018-10-07T12:49:12+5:302018-10-07T12:49:16+5:30
नवापूर तालुक्यातील घटना, जिल्हा न्यायालयाचा निकाल

भाचीवर बलात्कार प्रकरणी मामाला सात वर्ष कारावास
नंदुरबार : : मावस भाचीवर बलात्कार करणा:या युवकास नंदुरबार सत्र न्यायालयाने सात वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. जामदा फाटा, ता.नवापूर शिवारात ही घटना 12 जून 2016 रोजी घडली होती.
शिव्रे येथे मामाकडे आलेल्या युवतीला डोगेगाव येथे लगAात नाचायला घेवून जाण्याच्या बहाण्याने मावसमामा यानेच युवतीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. धर्मा नानजी वळवी, रा.डोगेगाव, ता.नवापूर असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 12 जून 2016 रोजी तो मावस भाची असलेल्या युवतीला शिव्रे येथून नातेवाईकांच्या घरून दुचाकीवर घेवून गेला होता. खांडबारा येथे पेट्रोल टाकून तो डोगेगावकडे निघाला. त्याचवेळी त्याच्या मनात सैताण जागा झाला. रस्त्यावरील जामदा फाटाजवळील शेतातील एका झोपडीजवळ दुचाकी थांबवून तो युवतीला तेथे घेवून गेला. रात्री नऊ वाजता त्याने युवतीवर बलात्कार केला होता. दोन तासाच्या अंतराने त्याने दोनवेळा बलात्कार केला.
युवतीने त्याच्यापासून सुटका करून घेत तेथून पलायन केले होते. डोगेगाव गाठून नातेवाईकाच्या घरी आसरा घेतला. दुस:या दिवशी सकाळी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून धर्मा नानजी वळवी याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरिक्षक जे.जी.शेख यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
नंदुरबार जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे यांच्या कोर्टात हा खटला चालला. सर्व साक्षी पुरावे लक्षात घेता न्या.वाघवसे यांनी आरोपी धर्मा वळवी यास बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड.गिरीश रघुवंशी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुनील धनगर होते. गेल्या 15 दिवसात 15 दिवसात नऊ गंभीर गुन्ह्यात आरोपींना कठोर शिक्षा झाली.
पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकिल सुशिल पंडित यांनी तपासी अधिकारी जे.जी.शेख व सरकारी वकील गिरीष रघुवंशी यांचे कौतूक केले.