हिवताप प्रतिरोध महिना, आरोग्याची काळजी घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST2021-06-05T04:23:04+5:302021-06-05T04:23:04+5:30
सध्या कोविड आजाराशी सर्वजण लढत असताना आता पाववसाळा आल्याने हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारांना डोके वर काढण्याची संधी न देता ...

हिवताप प्रतिरोध महिना, आरोग्याची काळजी घेण्याची गरज
सध्या कोविड आजाराशी सर्वजण लढत असताना आता पाववसाळा आल्याने हिवताप, डेंग्यू यासारख्या आजारांना डोके वर काढण्याची संधी न देता सर्व ग्रामस्थांनी डास उत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन दूषितस्थाने नष्ट केल्यास व आपापल्या गटारीतील घाण काढल्यास पाणी मुबलक प्रमाणात वाहते राहते, पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिल्यास, तसेच घरातील व घराबाहेरील पाणी साठवण्याच्या टाक्या आठवड्यातून एकदा धुऊन कोरड्या ठेवल्यास जलजन्य आजार दूर ठेवण्यास मोठी मदत होऊ शकते, असे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
महिनाभरात आरोग्य विभागाकडून जलद ताप सर्वेक्षण, डासोत्पत्ती, पाण्यात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम, ग्रामीण आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता समितीची सभा, कंटेनर सर्वेक्षण, चित्रकला, निबंध स्पर्धा, हस्तपत्रिकांचे वाटप यासह उपक्रम राबवण्यात येणार आहेत.