रेल्वे स्थानक हेरिटेज ऐवजी मॉडेल स्थानक बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:18 IST2020-02-04T12:18:15+5:302020-02-04T12:18:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक हेरिटेज बनविण्यापेक्षा ते मॉडेल स्थानक बनवावे, भविष्याचा विचार करावा, केवळ भावनेच्या ...

रेल्वे स्थानक हेरिटेज ऐवजी मॉडेल स्थानक बनवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक हेरिटेज बनविण्यापेक्षा ते मॉडेल स्थानक बनवावे, भविष्याचा विचार करावा, केवळ भावनेच्या मागे धावून उपयोग नाही. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेवून सुरू असलेले काम हे मॉडेल स्थानकाप्रमाणे करावे अशी मागणी प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरत-भुसावल रेल्वेमार्ग डबल लाईन अनेक दिवसांपासून सुरु आहे. या डबल लाईनमुळे छोटे-छोटे स्टेशन भव्य-दिव्य झालेत. पण मात्र नंदुरबारला मुख्य थांबा असूनही जुनीच इमारत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला हेरिटेज हे गोंडस नाव देण्यात आले आहे. या जुन्या इमारतीत कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. तिकीट खिडकी अत्यंत लहान असून जनरल वेटींग रुम पूर्ण नसल्याने तसेच बुकींग आॅफीस, महिलांना शौचालय, व्हीआयपी वेटींग रुम यांची जागा आज पूर्णपणे अयोग्य असल्याने भविष्याचा विचार करुन नवीन रेल्वे स्टेशन बनविणे काळाची गरज आहे. निव्वळ हेरिटेजच्या नावाखाली इंग्रजांचे दगडं सांभाळत बसण्यात अर्थ नाही. आजच्या इमारतीच्या भिंती पाहिल्या तर दोन-दोन फुटाच्या आहेत. हे तोडून नवीन बनविले तर एकाच जागेवर सर्व सुविधा उपलब्ध होतील व कायद्याचे पालन केले जाईल.
जुन्या इमारतीला ठेवणे म्हणजे भविष्यात प्रवाशांना व कर्मचाºयांना रोज अडचणीचा सामना करावा लागण्याचा हा प्रकार आहे. इमारत नवीन बनविली तर शंभर वर्षांपर्यंत प्रवाशांना व कर्मचाºयांना त्रास होणार नाही. हेरिटेजच ठेवायचे असेल तर नव्या इमारतीला तसा आकार किवा तशी डिझाईन द्यावी. परंतु निव्वळ भावनाशिल मुद्दा न करता व्यवहारिकतेची सांगड घालावी व नवीन रेल्वे स्थानकात सर्वसुविधा उपलब्ध करून द्याव्या. असेही या निवेदनात प्रवासी संघटनेचे स्पष्ट केले आहे.