शहाद्यात अल्पवयीन बालिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:11 IST2018-05-11T12:11:34+5:302018-05-11T12:11:34+5:30

शहाद्यात अल्पवयीन बालिकेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील परिमल कॉलनी भागात 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली़ या प्रकरणी गुन्हा दाखल आह़े
5 मे रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास परिमल कॉलनी येथे घराच्या छतावर पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला होता़ संशयित आरोपी हरिषकुमार अभिमन्यू पाटील याने बालिकेचे आई-वडील पहाटे घरात गेल्याचे पाहून पलंगावर एकटय़ा झोपलेल्या बालिकेसोबत अलि वर्तन करून तिचा विनयभंग केला़ घटनेमुळे घाबरलेल्या बालिकेने दोन दिवसांनी हा प्रकार कुटूंबियांसोबत कथन केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला़
याप्रकरणी पिडित बालिकेच्या वडिलांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हरिषकुमार पाटील याच्याविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल आह़े तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील करत आहेत़