भांडणाच्या रागातून नवापूरात युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:43 IST2019-02-14T11:43:26+5:302019-02-14T11:43:30+5:30

जाळून घेतले : बिजादेवी येथील घटना

 Maiden's suicide takes place in a new era | भांडणाच्या रागातून नवापूरात युवतीची आत्महत्या

भांडणाच्या रागातून नवापूरात युवतीची आत्महत्या

नंदुरबार : मैत्रिणीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून १७ वर्षीय युवतीने अंगावर रॉकेल टाकून जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना बिजादेवी, ता.नवापूर येथे घडली. विसरवाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनाली शुभम कोकणी (१७) रा.बिजादेवी, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली, उपचार घेतांना १३ रोजी तिचा मृत्यू झाला. सोनाली हिचे गावातीलच जयू पवार या मुलीशी भांडण झाले होते. या भानडणाचा राग तिने मनात धरला होता. त्यातूनच तिने घरात स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले.
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार घेतांना तिचा मृत्यू झाला.
याबाबत नातेवाईकांच्या खबरीवरून विसरवाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक साळवे करीत आहे.

Web Title:  Maiden's suicide takes place in a new era