वरूण राजाच्या आगमनासाठी कुकडेल परिसरात महारूद्राभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST2021-07-20T04:21:33+5:302021-07-20T04:21:33+5:30

निम्मा जुलै संपला तरी पावसाचे आगमन नसल्याने शेतकऱ्यांसह सारेच हवालदिल झाले आहेत. पावसाची आळवणी करण्यासाठी येथील कुकडेल परिसरात असलेल्या ...

Maharudrabhishek in Kukdel area for the arrival of King Varun | वरूण राजाच्या आगमनासाठी कुकडेल परिसरात महारूद्राभिषेक

वरूण राजाच्या आगमनासाठी कुकडेल परिसरात महारूद्राभिषेक

निम्मा जुलै संपला तरी पावसाचे आगमन नसल्याने शेतकऱ्यांसह सारेच हवालदिल झाले आहेत. पावसाची आळवणी करण्यासाठी येथील कुकडेल परिसरात असलेल्या चिंतेश्वर महादेव मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला. कोरोना परिस्थिती पाहता शासनाचे नियम पाळून पूजेसाठी पाच जोडप्यांना बसविण्यात आले होते. पहाटे पाच ते साडेआठ वाजेपर्यंत अभिषेक झाला. साडेआठ वाजता महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. गेल्यावर्षी कोरोनामुळे शेती उत्पादित मालाला भाव नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले होते. उत्पादन खर्च अधिक झाल्याने कवडीमोल भावात उत्पादित माल विकावा लागला. यंदा तरी चांगले दिवस येतील या आशेने उधार उसनवार पैसे करून बियाणांची खरेदी केली. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. दररोज वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे .परंतु पाऊस बरसत नसल्याने सारे चिंताग्रस्त झाले आहेत.

Web Title: Maharudrabhishek in Kukdel area for the arrival of King Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.