महाराष्ट्र लोकसेवा आयोगची शनिवारी पूर्व परीक्षा, नंदुरबारात ९ केंद्रांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:20+5:302021-09-03T04:31:20+5:30

नंदुरबार :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षा ४ सप्टेंबर रोजी ...

Maharashtra Public Service Commission pre-examination on Saturday, creation of 9 centers in Nandurbar | महाराष्ट्र लोकसेवा आयोगची शनिवारी पूर्व परीक्षा, नंदुरबारात ९ केंद्रांची निर्मिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगची शनिवारी पूर्व परीक्षा, नंदुरबारात ९ केंद्रांची निर्मिती

नंदुरबार :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षा ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरु होणार आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यातील ९ उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली असून ३ हजार ६४३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. शहरातील एच.जी. श्रॉफ हायस्कूल नंदुरबार, जी.टी. पाटील महाविद्यालय नंदुरबार, डी.आर. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, एस. ए. मिशन (मराठी) व एस. ए. मिशन (इंग्रजी) स्कूल नंदुरबार, पी.के. पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल या उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे, परिक्षेसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असून १५२ वर्गखोल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे तसेच तहसीलदार उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक,समवेक्षक अधिकारी, कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण पहिले प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन ३ सप्टेंबर रोजी परीक्षा केंद्रावर होणार आहे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra Public Service Commission pre-examination on Saturday, creation of 9 centers in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.