शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

चारपैकी तीन मतदारसंघांत एकाच कुटुंबाकडे आमदारकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 11:13 IST

Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार जिल्हा ठरतोय वैशिष्ट्यपूर्ण; तीनही मतदारसंघांतील आमदारांनी साधली डबल हॅट्ट्रिक  

Maharashtra Assembly Election 2024 : नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार व अक्कलकुवा मतदारसंघात एकाच घराण्याकडे सत्ता राहिल्याचे चित्र आहे. आता शहादादेखील त्या मार्गावर असून, या मतदारसंघात सलग दोन निवडणुकांत एका घरात आमदारकी राहिली आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन मतदारसंघांत अपवाद वगळता एकाच घराण्याकडे सत्ता राहिली आहे. तिन्ही मतदारसंघांत तिन्ही आमदारांनी डबल हॅट्ट्रिक साधली आहे. हाही एक प्रकारचा  विक्रमच म्हणावा लागेल.

नवापूरमध्ये नाईकनवापूर मतदारसंघ हा आजवर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. १९८२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपासून या मतदारसंघात सुरूपसिंग नाईक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. सलग आठ वेळा सुरूपसिंग नाईक येथून निवडून आले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक यांच्याकडे सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आहे. एकंदर पाहता तब्बल नऊ टर्म नाईक घराण्याकडे या नवापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राहिले आहे.  

नंदुरबारमध्ये गावित नंदुरबार मतदारसंघामध्येही एकाच घराण्याकडे सातत्याने आमदारकी राहिलेली दिसून येते. येथे सलग सहा टर्म डाॅ. विजयकुमार गावित यांच्याकडे प्रतिनिधित्व आहे. त्यापूर्वी तीन टर्म त्यांचे सासरे आर. पी. वळवी यांच्याकडे या मतदारसंघाची आमदारकी होती. अर्थात नऊ टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे वळवी-गावित कुटुंबांकडे आहे. 

अक्कलकुवा, शहाद्यात पाडवी अक्कलकुवा मतदारसंघात ॲड. के. सी. पाडवी हे सलग सात वेळा निवडून आले आहेत. पूर्वीचा धडगाव व नंतर अक्कलकुवा असे या मतदारसंघाचे स्वरूप राहिले आहे. ॲड. के. सी. पाडवी हे १९९०च्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग सात टर्म ते या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. शहादा मतदारसंघही दोन टर्मपासून पाडवी कुटुंबाकडे आहे. २०१४च्या निवडणुकीत उदेसिंग पाडवी हे निवडून आले होते, तर २०१९च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र राजेश पाडवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nandurbar-acनंदुरबार