महाराणा प्रतापसिंह मंडळातर्फे नंदुरबारात गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:35 IST2019-07-23T12:35:46+5:302019-07-23T12:35:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे नंदुरबार व टोकरलताव येथील समाज बांधवांसाठी येथे विद्यार्थी ...

Maharana Pratap Singh Mandal in Nandurbar | महाराणा प्रतापसिंह मंडळातर्फे नंदुरबारात गुणगौरव समारंभ

महाराणा प्रतापसिंह मंडळातर्फे नंदुरबारात गुणगौरव समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे नंदुरबार व टोकरलताव येथील समाज बांधवांसाठी येथे विद्यार्थी गुणगौरव, पेन्शन योजना, शिलाई मशीन वाटप, मोफत कराटे प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा र}ा चंद्रकांत रघुवंशी तर प्रमुख अतिथी म्हणून नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता राजपूत, नगरसेविका अरुणा राजपूत (नवापूर), नंदुरबार पालिका शिक्षण मंडळ सभापती सोनिया राजपूत उपस्थित होत्या. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विद्याथ्र्याचा गुणगौरव, विधवा व निराधार महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. तसेच वृद्धांना पेन्शन योजनेचे वाटप करण्यात आले. यावेळी राजपूत समाजातील महिला मंडळाची स्थापनाही करण्यात आली. राजपूत समाजातील पवनसिंग ईश्वरसिंग वाघ (राजपूत) (चोपडा) यांनी शैक्षणिक क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी व हेमलता पाटील यांनी श्री महाराणा प्रतापसिंह युवक मंडळातर्फे राबविण्यात येणा:या उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन वाय.एस. पाटील यांनी तर आभार राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष वाल्मिकसिंग राजपूत व पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Maharana Pratap Singh Mandal in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.