नंदुरबार येथे महाराणा प्रताप जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:52+5:302021-05-10T04:30:52+5:30
जय हिंद प्रतिष्ठान, नंदुरबार वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद प्रतिष्ठान व व्ही. ...

नंदुरबार येथे महाराणा प्रताप जयंती साजरी
जय हिंद प्रतिष्ठान, नंदुरबार
वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद प्रतिष्ठान व व्ही. जी. राजपूत पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक राजपूत व पत्रकार सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डी. व्ही. राजपूत, भीमसिंग राजपूत, वाय. एस. पाटील, संजयसिंग सिसोदिया, हेमंतसिंग राजपूत, राजेंद्र राजपूत, पंडित राजपूत, चंद्रकांत राजपूत, रत्नदीप राजपूत, बाबा राजपूत, राजेश राजपूत, चेतन राजपूत, सुमनसिंग राजपूत, अभयसिंग राजपूत, जयपाल राऊळ, दिग्विजय राजपूत, भूषण गिरासे, सुनील राजपूत, राहुल राजपूत, सुदर्शन राजपूत, हेमंत राजपूत, पवन राजपूत, विकी राजपूत, पप्पू राजपूत, नरेंद्र राऊळ, योगेश राजपूत उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन जय हिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहितसिंग राजपूत यांनी केले होते.