कोरोना संकट निवारणार्थ हिंदू सेवा साहाय्य समितीने केला महामृत्युंजय यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST2021-04-14T04:27:42+5:302021-04-14T04:27:42+5:30

गेल्या एक महिन्यापासून भारतभरामध्ये त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून नंदुरबार जिल्ह्यात दररोज या महामारीमुळे अनेकांना आपला जीव ...

Mahamrityunjaya Yajna performed by Hindu Seva Sahayya Samiti to alleviate the Corona crisis | कोरोना संकट निवारणार्थ हिंदू सेवा साहाय्य समितीने केला महामृत्युंजय यज्ञ

कोरोना संकट निवारणार्थ हिंदू सेवा साहाय्य समितीने केला महामृत्युंजय यज्ञ

गेल्या एक महिन्यापासून भारतभरामध्ये त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून नंदुरबार जिल्ह्यात दररोज या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कोरोना महामारीचे उच्चाटन व्हावे; त्याचबरोबर विश्वामध्ये सर्व लोकांना उत्तम आरोग्य लाभावे, विश्वात शांती नांदावी या विश्वव्यापक हेतूने आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहे; कारण या संकटाचे निवारण ईश्वर आणि आध्यात्मिक उपायच करू शकतात; म्हणून आध्यात्मिक उपायार्थ महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले, असे हिंदू सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

भागवतकार रवींद्र पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले. यात प्रथम श्री गणेशपूजन, नंतर मातृका स्थापना, नवग्रह स्थापना तसेच श्री रुद्रस्थापना आणि पूजन करण्यात आले. महामारी संकट निवारण होऊन विश्वशांती स्थापित होवो; हा प्रधान संकल्प आधी करण्यात आला. नंतर संकट विनाश होण्यासाठीचे मंत्र, जप, हवन आणि पूजन करण्यात आले.

अधिवक्ता अनिल लोढा, अभय अग्रवाल, कपिल चौधरी, संतोष जैन यांच्या शुभ हस्ते सपत्निक पूजन झाले. यज्ञाचा संकल्प सुमित परदेशी यांनी केला. यावेळी हिंदू सेवा साहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, जितेंद्र मराठे, पंकज डाबी, आकाश गावित, आदी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळत दोन दोन जोडपी बोलवून सामाजिक अंतर ठेवून हा यज्ञ झाला.

Web Title: Mahamrityunjaya Yajna performed by Hindu Seva Sahayya Samiti to alleviate the Corona crisis