लक्झरीची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:29+5:302021-07-09T04:20:29+5:30

दीपेश जयेश गावित व सचिन राकेश वळवी असे मयतांची नावे आहेत, तर अमर राजेश गावित (तिघेही रा. नटावद, ता. ...

Luxury two-wheeler hit, two killed on the spot | लक्झरीची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

लक्झरीची दुचाकीला धडक, दोन जण जागीच ठार

दीपेश जयेश गावित व सचिन राकेश वळवी असे मयतांची नावे आहेत, तर अमर राजेश गावित (तिघेही रा. नटावद, ता. जि. नंदुरबार) हा जखमी झाला. तिन्ही जण नटावद येथून मोटरसायकलीने (क्रमांक एमएच १८ पी ४९४८) चिंचपाडा ता. नवापूर येथे जात असताना विसरवाडीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल समेजासमोर नवापूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसने (क्रमांक जिजे १४ के ०९२४) मोटरसायकलला समोरून धडक दिली. दीपेश व सचिन यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर राकेश गंभीर जखमी झाला. त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातानंतर लक्झरी बसचालक घटनास्थळावरून फरार झाला. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात हवालदार प्रदीप जिभाऊ वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्झरी बसचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश येलवे करीत आहेत.

Web Title: Luxury two-wheeler hit, two killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.