धुळे-सूरत महामार्गावर लक्झरी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ४० प्रवाशांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 23:47 IST2020-11-16T23:46:50+5:302020-11-16T23:47:18+5:30

लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक घेतला पेट

Luxury bus catches fire at nandurbar on Dhule Surat highway | धुळे-सूरत महामार्गावर लक्झरी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ४० प्रवाशांचे प्राण

धुळे-सूरत महामार्गावर लक्झरी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ४० प्रवाशांचे प्राण

नवापूर: औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसला अचानक भीषण आग लागली. सोमवार पहाटे सकाळी ३:३० वाजेच्या  सुमारास धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी पासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल लगत लक्झरी बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

एमके ट्रॅव्हल्स ची बस क्रमांक एम एच ४० ए टी २९२९ ही औरंगाबादहून अहमदाबाद कडे जात होती. बस पहाटे नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट उतरून सोनखांब शिवारातून जात असता लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच चालकाने तत्काळ रस्त्याच्या कडेला बस घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या.



सुदैवाने जीवितहानी टळली मात्र आगीचे स्वरुप अतिशय तीव्र असल्याने काही क्षणात बसने पेट घेतला. आगीने रौद्र रूप धारण केले या दरम्यान काही प्रवास्यांचे साहित्य गाडीत अडकल्या मुळे जळाले.आहे.

Web Title: Luxury bus catches fire at nandurbar on Dhule Surat highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.