चरणमाळ घाटात लक्झरी बसचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:10 IST2020-02-12T12:10:11+5:302020-02-12T12:10:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरापासुन २० किलोमीटर अंतरावरील पिंपळनेर-नवापुर रस्त्यावर चरणमाळ घाटात सोमवारी मध्यरात्री खाजगी बसचा अपघात होउन ...

Luxury bus accident in Charanmaal Ghat | चरणमाळ घाटात लक्झरी बसचा अपघात

चरणमाळ घाटात लक्झरी बसचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शहरापासुन २० किलोमीटर अंतरावरील पिंपळनेर-नवापुर रस्त्यावर चरणमाळ घाटात सोमवारी मध्यरात्री खाजगी बसचा अपघात होउन सहचालकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. या अपघातात चार बालकांसह १६ प्रवासी जखमी झाले आहेत़
सुरत येथील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची जीजे १४ एक्स २२५० ही बस धुळे येथील लग्न कार्य आटोपुन सुरतकडे परत जात असतांना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चरणमाळ घाटात तिव्र उतारावरील एका वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरील संरक्षण कठड्यावर आदळल्याने अपघात झाला. या अपघातात बसचा सहचालक जागीच ठार झाला तर इतर १६ प्रवासी जखमी झाले़ बसमध्ये एकूण ३७ प्रवासी होते. कोंडाईबारी घाटातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने धुळे व सुरत कडे जाणारी वाहने चरणमाळ मार्गे ये जा करीत आहेत. रात्री देखील या रस्त्याचा वापर वाढला आहे. अपघातात लक्झरी बसच्या दर्शनी भाग दाबला गेल्याने बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर बस चालकाने तेथुन पळ काढला. सुरतेकडे भाजीपाला वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांनी जखमींंना सुरत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. नवापुर पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Luxury bus accident in Charanmaal Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.