उघडय़ा खिडकीतून पर्स केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:10 IST2019-09-20T12:10:49+5:302019-09-20T12:10:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उघडय़ा खिडकीतून हात घालून चोरटय़ाने 31 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना ...

उघडय़ा खिडकीतून पर्स केली लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उघडय़ा खिडकीतून हात घालून चोरटय़ाने 31 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याची घटना अक्कलकुवा येथे घडली. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा येथील कोंडवाडा गल्लीत राहणारे कांतीलाल सोनुलाल जैन यांच्या घराची खिडकी उघडी असल्याची संधी साधत अज्ञात चोरटय़ाने ही चोरी केली. घरात टेबलावर ठेवलेली पर्स चोरटय़ाने खिडकीतून हात घालून अलगद लंपास केली. पर्समध्ये सोन्याची चेन, चांदीची अंगठी व एक हजार रुपये रोख असा एकुण 31 हजार रुपयांचा ऐवज होता.
जैन यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पर्सची शोधाशोध केली. परंतु उपयोग झाला नाही.
याबाबत कांतिलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विसावे करीत आहे.
दरम्यान, शहरात यापूर्वी देखील अशाच पद्धतीने चो:या झाल्या आहेत. त्यांचाही तपास लागलेला नाही. चोरटय़ाचा शोध घेवून छडा लावावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.