अश्व शर्यती पाहण्यासाठी लोटला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:01 IST2019-10-11T12:01:41+5:302019-10-11T12:01:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पहाडातील प्रमुख सण-उत्सवांपैकी एक असलेल्या काठी, ता.अक्कलकुवा येथील राजवाडी दसरानिमित्त घेण्यात आलेल्या घोडे शर्यतीसाठी ...

Lot to the horse race to see the horse race | अश्व शर्यती पाहण्यासाठी लोटला जनसागर

अश्व शर्यती पाहण्यासाठी लोटला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पहाडातील प्रमुख सण-उत्सवांपैकी एक असलेल्या काठी, ता.अक्कलकुवा येथील राजवाडी दसरानिमित्त घेण्यात आलेल्या घोडे शर्यतीसाठी 120 घोडे दाखल झाले होते. परंतु उशिर झाल्यामुळे 30 घोडय़ांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे 90 घोडे प्रत्यक्ष शर्यतीत होते. 
नेहमी सुर्य व चंद्रावरुन कालगणना करणा:या सातपुडय़ातील आदिवासींमध्ये नवाय, दसरासाठीही कालगणना सुरू होती. याच कालगणनेत नऊ दिवसाची नवाय, दहावा दिवस दस:याचा व विस दिवसाची दिवाली याला विशेष महत्व दिले जाते. अन्यत्र साजरी होण्या:या दस:यापेक्षा पहाडातील दसरा वेगळा आहेत. दसरा शब्द उच्चारताच काठीत उसळणारी गर्दी व घोडय़ांची शर्यतच तेथील नागरिकांच्या डोळ्यासमोर येते. परंपरेनुसार मागील महिन्याच्या अखेरीस नवाय सुरू होताच तेथील नागरिकांमध्ये दस:याचेही वेध लागले होते. नऊ दिवसाची नवाय संपताच राजवाडी दसरा साजरा करण्यासाठी सातपुडय़ातील आदिवासींची पावले काठीकडे वळली. दस:यासाठी काठीत येणा:यांमध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेशातील बांधवांनीही उपस्थिती नोंदवली. त्यामुळे धडगावच्या बाजूने भांग्रापाणी तर मोलगीच्या बाजूने निंबीपाडार्पयत अखंड जनसमुदाय दिसून आला. त्याशिवाय चनवाई, वाघडोंगर माळ या भागातही सर्वत्र गर्दी झाली होती. मंगळवार व बुधवार दोन्ही दिवस या भागात दसरा साजरा करणा:यांची मांदियाळीच दिसून आली. 
येथील घोडे शर्यतीसाठीही दोन राज्यातून घोडे दाखल झाले होते. त्यात धडगाव तालुक्यातील खांडबारा, मोजरा, खडक्या तर अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ, पलासखोब्रा, डनेल, मुखडी, काठी, सल्लीबार, जामली, बोखाडी, बेडाकुंड, सेलपाणी, नर्मदा पुनर्वसन, देवमोगरा पुनर्वसन, सोमावल व गुजरातमधील सिनआमडी, सेनकी येथून 120 घोडे दाखल झाले होते. जामली या एकाच गावातून तीन घोडे सहभागी झाले होते. त्यापैकी 30 घोडय़ांना उशिर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे प्रत्यक्ष शर्यतीत 90 घोडे सहभागी झाले होते. यानंतर छाप्री ता.धडगाव येथील शर्यतीसाठी घोडे मालकांनी तयारी सुरू केली आहे. शर्यतीसाठी माजी जिल्हा परिषद सभापती सी.के.पाडवी, बहादूरसिंग पाडवी, माकत्या वसावे, गणपत पाडवी, करणसिंग पाडवी, सागर पाडवी, राजेंद्र पाडवी, रणजित वसावे, चंद्रसिंग वसावे, पोलीस पाटील रेंहज्या वसावे यांनी संपूर्ण नियोजन केले होते. शांतता व सुव्यवस्थेसाठी मोलगीचे पोलीस निरीक्षक पी.सी.सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या दिवशी चार पोलीस अधिकारी, 63 कर्मचारी तर दुस:या दिवशी तीन अधिकारी 24 कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला होता.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या काठी येथील दसरा पूजन रायसिंग वसावे व गोंब:या वसावे यांच्या हस्ते करण्यात आले. परंपरेनुसार नवाय खुटा पूजन, राजगादी पूजन, शस्त्र पूजन, घोडय़ाची नाल पूजन करण्यात आले. ही पूजा पूर्ण झाल्यानंतर घोडय़ांच्या शर्यतीला सुरुवात करण्यात आली. 
शर्यतीनिमित्त गर्दी होत असल्यामुळे अक्कलकुवाहून मोलगीमार्गे धडगावकडे जाणारीवाहतुक डाबपासूनच जमानामार्गे वळविण्यात आली होती. तर धडगावहून मोलगीर्पयत होणारी वाहतूक भांग्रापाणीर्पयतच करण्यात आली होती.
अश्व शर्यती पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासह जवळच्या गुजरात व मध्य प्रदेशातील अश्व शौकीनांनीही हजेरी लावली. त्यामुळे निंबीपाडार्पयत प्रेक्षकांची गर्दी झाली होती.

बोखाडी, ता.अक्कलकुवा येथील पिंटय़ा खाअल्या तडवी यांचा घोडा शर्यतीत प्रथम ठरला.
दुस:यास्थानी खांडबारा, ता.धडगाव येथील सायसिंग कागल्या पाडवी यांच्या घोडय़ाने पटकावला.
तृतीय बक्षीस खडक्या, ता.धडगाव येथील वळवी यांच्या घोडय़ाला देण्यात आले.
 

Web Title: Lot to the horse race to see the horse race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.