शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

जिल्ह्यात पावणेआठ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आॅगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आॅगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी सात कोटी ७५ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात पावसामुळे जिल्ह्यातील २६ हजार ४६१ शेतकऱ्यांकडील ११ हजार २४२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.नंदुरबार तालुक्यातील २८२ हेक्टर, नवापूर ३,९१८ हेक्टर, अक्कलकुवा २,५९९ हेक्टर, शहादा १,१९० हेक्टर, तळोदा १२५ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात ३,१२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.सप्टेंबर महिन्यातीलनुकसानीचे पंचनामेसप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाºयामुळे ८,२३४ शेतकऱ्यांच्या शेतात ४,३६४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात १,१७० शेतकºयांचे ९८५ हेक्टर, नवापूर ५,१२३ शेतकºयांचे १,८२८ हेक्टर, अक्कलकुवा २१० शेतकºयांचे ६० हेक्टर, शहादा ३५१ शेतकºयांचे २६१ हेक्टर आणि अक्राणी तालुक्यात १,३८० शेतकºयांच्या १,२३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने कापूस, ऊस, मका,सोयाबीन , मिरची, तूर, भात आणि ज्वारी पिकांचा समावेश आहे. दोन्ही महिन्यातील नुकसानीची मदत शेतकºयांना तातडीने मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.(विशेष पान/३)