उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून केले सव्वा लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:21 IST2020-11-10T12:17:21+5:302020-11-10T12:21:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून एक लाख २० हजार रुपयांच्या दादर पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी काथर्दे ...

उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून केले सव्वा लाखाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून एक लाख २० हजार रुपयांच्या दादर पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी काथर्दे दिगर, ता.शहादा येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, काथर्दे दिगर येथील गवल्या ओल्या वसावे यांचे गाव शिवारात शेत आहे. त्या शेतात रब्बीची दादर टाकली आहे. त्या पिकात बायल्या रुल्या पाडवी यांनी अनाधिकारपणे शेतात घुसून थेट पिकांवर ट्रॅक्टर चालविले. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. साधारणत: एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप गवल्या वसावे यांनी केला आहे.
रब्बीची दादर नुकतीच पेरली होती. पीक चांगले जोमदार आले होते. अशातच बायल्या पाडवी यांनी आपल्या शेतात ट्रॅक्टर चालवून एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद गवल्या वसावे यांनी दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून बायल्या पाडवी यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.