नवापूर आगाराला साडेनऊ कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:53 IST2020-08-20T12:53:30+5:302020-08-20T12:53:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाल्यानंतर नवापूर आगारातून तालुक्यांतर्गत २० बस फेऱ्या सुरूझाल्या आहेत. प्रति ...

नवापूर आगाराला साडेनऊ कोटींचा तोटा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाल्यानंतर नवापूर आगारातून तालुक्यांतर्गत २० बस फेऱ्या सुरूझाल्या आहेत. प्रति माह आठ लाख रूपये उत्पन्न असलेल्या नवापूर आगाराचे उत्पन्न जेमतेम २५ हजारावर आले आहे. लॉकडाऊनच्या काळात बस फेºया बंद राहिल्याने आगाराला नऊ कोटी ६० लाख रूपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी नवापूर आगाराची बस गुजरात, मध्यप्रदेश या लगतच्या राज्यासह जिल्ह्यांतर्गत व राज्यात लांब पल्ल्याच्या मोठ्या शहरापर्र्यंत दररोज ये-जा करीत असे. एस.टी.ची धावणारी चाके २३ मार्च पासून थांबली होती. २२ मे पासून मर्यादित पल्ल्यासाठी ही चाके पुन्हा गतीमान झाली. दोन्ही परिस्थितीत मात्र कमालीची तफावत आहे. मालवाहतुकीसाठी नवापूर आगारास या आधीही पोशक वातावरण नव्हते. परिणामी अनलॉकच्या काळातही हा प्रयोग सुरू होऊ शकला नाही. खाजगी बसेस महामार्गावरून धावत असल्याने शासन स्तरावर मर्यादित २२ आसन क्षमतेसाठी एसटीला धावण्याची परवानगी मिळाल्यास हळूहळू परिस्थिती सामान्य होऊन संभावित तोटा व नुकसान कमी होईल, असा सुर कर्मचारी वर्गातून उमटत आहे. कोरोना संक्रमणाचा असलेला धोका पाहता दिपावली नंतरच या परिस्थितीमध्ये बदल होईल असा कयास लावला जात आहे.
नवापूर आगारात एकूण ७५ बसेस असून, त्याद्वारे दररोज ३६० फेऱ्यांचे नियोजन पार पाडले जाते. दर दिवशी २३ हजार किलोमीटरचा टप्पा पार पाडून आगारास सरासरी आठ लाख रूपये उत्पन्न मिळत असे. लॉकडाऊनमुळे तब्बल दोन महिने एसटीची चाके जशी थांबली तसे हे उत्पन्नदेखील थांबले. त्यातुन प्रति माह दोन कोटी ४० लाख व चार महिन्यात नऊ कोटी ६० लाख रूपयांच्या उत्पन्नास आगार मुकले. हे नुकसान भरून काढण्यासाठी मालवाहतुकीचा पर्याय आजमाविण्यात आला. मात्र हा पर्याय सपशेल फोल ठरला.
नवापूर आगारात चालक, वाहक, कार्यालयीन व यांत्रिकी कर्मचारी मिळून ३०४ कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कार्यशाळेतील दोन कर्मचारी, एक वाहक निवृत्त झालेत तर एका चालकाचे हृदय विकाराने निधन झाले. सर्वांना जुन अखेर पावेतो वेतन मिळाले असून, त्यांना जुलैच्या वेतनाची प्रतिक्षा लागून आहे.
लॉकडाऊनच्या काळात पायपीट करून घराकडे परतणाºया मजूर वर्गास घरापावेतो एसटीद्वारे परत पाठविण्याची योजना राज्य शासनाकडून राबविण्यात आली. नवापूर आगार राज्य सीमेवर असल्याने नवापूर आगाराने हे कार्य नियोजनपूर्वक व्यवस्थितरित्या पार पाडले. एका दिवशी महत्तम ६०० ते ७०० फेºयांचे नियोजनही आगाराने यशस्वी करून दाखविले. ११ ते ३१ मे दरम्यान सीमा तपासणी नाक्यावरून मध्यप्रदेशच्या सीमेवर सर्वाधिक १९ हजार ८८८ प्रवाश्यांसाठी बसेसच्या ९०७ फेºया, छत्तीसगड सीमेवर दोन हजार ३७६ प्रवाश्यांसाठी बसेसच्या १०८ फेºया व राज्यांतर्गत एक हजार २७६ प्रवाश्यांसाठी बसेसच्या ५८ फेºया नवापूर आगारातुन झाल्या. राज्य परिवहन महामंडळाने यासाठी एक कोटी ९६ लाख २१ हजार ३८५ रूपये खर्च करून २३ हजार ५४० प्रवाश्यांच्या घरवापसीचे कार्य नवापूर आगाराने पार पाडले.
नवापूर आगारातुन सध्या नंदुरबार, खांडबारा, मोरकरंजा व खोकसा या ठिकाणी बसच्या २० फेºया सुरू करण्यात आल्या आहेत. कोविड १९ मुळे एका बसमधे २२ प्रवाश्यांची असलेली महत्तम मयार्दा पाहता या फेºयांना चांगला प्रतिसाद आहे. तालुक्यांतर्गत फेºयांमधून एसटीचा खर्च निघत नसल्याने आंतरजिल्हा व लगतच्या गुजरातमधील केवळ सुरत जिल्ह्यासाठी वाहतुक सुरू झाल्यास आगाराच्या उत्पन्नात अपेक्षित बदल दिसून येईल. -नाना भामरे, सहाय्यक वाहतूक
निरीक्षक, नवापूर