दोन कोटीपेक्षा अधीकचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:19 IST2021-01-11T12:19:28+5:302021-01-11T12:19:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन दिवसांच्या पावसामुळे मिरची पाण्यात भिजल्याने व्यावसायिकांचे दोन कोटी पेक्षा अधीकचे नुकसान झाल्याचा अंदाज ...

दोन कोटीपेक्षा अधीकचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दोन दिवसांच्या पावसामुळे मिरची पाण्यात भिजल्याने व्यावसायिकांचे दोन कोटी पेक्षा अधीकचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महिनाभरात हा दुसरा आर्थिक फटका बसल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. दरम्यान, रविवारी पावसाने उघडीप दिल्याने ओली झालेली मिरची सुकविण्यासाठी व्यावसायिकांची धडपड सुरू असल्याचे चित्र पथारींवर होते.
नंदुरबारसह जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. या पावसात मिरचीचे सर्वाधिक नुकसान झाले. शेतातील मिरची प्रमाणेच खरेदी करून वाळत टाकलेली मिरची देखील पावसात भिजली, चिखलात गेली. पथारींवर पाण्याचा निचरा होण्याची सोय नसल्याने चिखल देखील निर्माण झाला. त्यामुळे अधीकच नुकसान झाले. यामुळे किमान दोन कोटीपेक्षा अधीकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मिरची खरेदी न करण्याचा निर्णय व्यापारींनी घेतला आहे. रविवारी पाण्यात भिजलेली मिरची बाहेर काढून ती सुकविण्यासाठी व्यापारी, मजुर यांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दिसून आले.