अक्कलकुवा शहरात डिस्टन्सिंगला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:35+5:302021-06-24T04:21:35+5:30

भरधाव डंपरांमुळे नागरिकांमध्ये भीती नंदुरबार : शहरातील तळोदा रोड मार्गाने धुळे चाैफुलीकडे भरधाव वेगात धावणाऱ्या वाळू वाहतूक करणारे डंपर ...

Lose the distance in Akkalkuwa city | अक्कलकुवा शहरात डिस्टन्सिंगला खो

अक्कलकुवा शहरात डिस्टन्सिंगला खो

भरधाव डंपरांमुळे नागरिकांमध्ये भीती

नंदुरबार : शहरातील तळोदा रोड मार्गाने धुळे चाैफुलीकडे भरधाव वेगात धावणाऱ्या वाळू वाहतूक करणारे डंपर नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

आता लक्ष ग्रामपंचायत निवडणुकांकडे

नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागून आहे. जानेवारी ते जुलै या दरम्यान जिल्ह्यातील ९१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ठिकाणी प्रभागरचनेचे स्थगित झालेला कार्यक्रम लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील कचऱ्याचा प्रश्न

नंदुरबार : शहरापासून जवळ असलेल्या गावशिवारातील रहिवासी वसाहतींमधील नागरिकांकडून शहरी हद्दीत कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायतींकडून घंटागाड्या सुरू न केल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

धुळे मार्गाने नाशिक बसेस वाढवाव्यात

नंदुरबार : नाशिकसाठी नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या बसेस ह्या धुळे मार्गाने सोडण्याची मागणी होत आहे. पिंपळनेर ते सटाणा यादरम्यान महामार्गाचे काम सुरू आहे. यातून बसेसमधून प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे. यातून बसेस उशिराने धावत असल्याची माहिती आहे.

कोळदे ते कोरीटदरम्यान उपाययोजना हव्यात

नंदुरबार : तालुक्यातील कोळदे ते कोरीट गावादरम्यान तयार झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या महामार्गावर उपाययोजना नसल्याने वाहनधारकांना अडचणीचे ठरत आहे. महामार्गावर स्वयंचलित कॅटाईज, पांढरे पट्टे, सुरक्षा फलक व मार्गदर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना रात्री प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे. यातून अपघातांची भीती असून मार्गावर तातडीने फलक लावण्याची मागणी आहे.

लसीकरण केंद्रांमुळे दुर्गम भागांत समाधान

धडगाव : आरोग्य विभागाकडून दुर्गम व अतिदुर्गम भागांत लसीकरणासाठी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सोय करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून, या केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी नागरिक हजेरी लावत आहेत.

सर्वच ठिकाणी कैरी खरेदी होतेय जोरात

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारांत सध्या कैऱ्यांची आवक वाढली आहे. मंगळवारी नंदुरबार व शहादा, बुधवारी प्रकाशा (ता. शहादा), शुक्रवारी तळोदा व अक्कलकुवा तसेच सोमवारी धडगावच्या बाजारात कैऱ्यांची आवक झाली.

Web Title: Lose the distance in Akkalkuwa city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.